वाशिम जिल्ह्यात ‘श्रीं’चा गजर!

By admin | Published: February 19, 2017 02:06 AM2017-02-19T02:06:11+5:302017-02-19T02:06:11+5:30

रिठद संस्थानवर भाविकांची मांदियाळी : लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

'An alarm of shri' in Washim district! | वाशिम जिल्ह्यात ‘श्रीं’चा गजर!

वाशिम जिल्ह्यात ‘श्रीं’चा गजर!

Next

वाशिम/रिठद, दि. १८- शेगावनिवासी ङ्म्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त जिल्हय़ातील ङ्म्रींच्या संस्थानवर 'गण गण गणात बोतें' चा गजर ऐकावयास मिळाला. जिल्हाभरात आयोजित महाप्रसादाचा लाभ लाखो भाविकांनी लाभ घेतला. जिल्हय़ाचे प्रतिशेगाव समजल्या जाणार्‍या रिठद येथील ङ्म्री गजानन महाराज मंदिरातील ङ्म्रींच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मांदियाळी होती.
वाशिम जिल्हय़ाचे प्रतिशेगाव म्हणून नावलौकिकास आलेल्या रिठदनगरीमध्ये शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखी उत्सव सोहळय़ासाठी जिल्हाभरातून भाविक मोठय़ा संख्येने दाखल झाले होते. टाळ-मृदंग व ढोल-ताशाच्या गजरात श्री गजाननाचा जयघोष करीत संपूर्ण रिठदनगरी दुमदुमून गेली. शनिवारी सकाळी ङ्म्रींच्या मंदिरात मूर्तीची विधिवत पूजा, अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी १0 ते १२ वाजतादरम्यान हभप साखरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी सिद्धेश्‍वर संस्थान येवताचे महंत शांतीपुरी महाराज यांच्याहस्ते महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी १२ वाजतापासून रात्री उशिरापर्यंंत भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. गत २0 पासून रिठद येथे ह्यश्रींह्णचा प्रकट दिन सोहळा मोठय़ा उत्साहाने साजरा केला जात आहे. ङ्म्रींच्या प्रकटदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री १२ वाजता ङ्म्रींच्या मंदिरासमोर फटाक्याच्या आतषबाजीने प्रकट दिनाचे स्वागत करण्यात आले. शनिवारी ङ्म्री संत गजानन महाराज पालखीचा मिरवणूक सोहळा रिठद नगरीतून काढण्यात आला. यावेळी गावातील महिलांनी पालखी मार्गावर रांगोळय़ा काढून पालखी मार्ग सजविला होता. ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, चहा, फराळाची व्यवस्था केली होती.
ङ्म्रींच्या प्रकट दिनी ङ्म्री मंदिरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक यांच्यासह लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी आदींचा समावेश आहे. वाशिम येथे श्री संत गजानन महाराज संस्थान व देवपेठ येथील संस्थानमध्ये 'श्रीं'च्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी होती. रिठद ते वाशिम आणि रिठद ते रिसोड या दरम्यान काळीपिवळी टॅक्सी संघटनेने शनिवारी मोफत प्रवासी सेवा दिली.

Web Title: 'An alarm of shri' in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.