प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 02:22 PM2018-08-23T14:22:18+5:302018-08-23T14:22:56+5:30

जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लघू आणि मध्यम असे सर्व प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, सांडवा असलेल्या प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

alert for villages on river due to 'overflow' | प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Next

वाशिम: जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लघू आणि मध्यम असे सर्व प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, सांडवा असलेल्या प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. अशात पावसाचे पाणी आणि सांडव्याच्या पाण्यामुळे प्रकल्प परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर येण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर पाटबंधारे विभागाच्यावतीने संबंधित ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

वाशिम जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जलाशय पूर्ण भरले असून, बहुतांश प्रकल्पातून पाण्याच्या सांडव्याद्वारे २० सेंमीपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत पाऊस जोरदार पडत असल्याने प्रकल्पांच्या कालव्याचे पाणी सांडव्याद्वारे नदी नाल्यातून वाहत असताना नदी, नाल्याच्या पुराची पातळी कधीही वाढून संबंधित गावांत पाणी शिरून नुकसान होण्याची भिती आहे.

बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी सतर्कता बाळगावी, अशी सूचना वजा इशारा पाटबंधारे विभागाच्यावतीने विविध ग्रामपंचायतींना पत्राद्वारे देण्यात आली आहे. सदर पत्रानुसार ग्रामस्थांनी दक्षता बाळगावी म्हणून या पत्राची प्रत ग्रामपंचायत कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: alert for villages on river due to 'overflow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.