कारंजातील सर्व शाखा अभियंता, कर्मचारी सामुहिक रजेवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:25 PM2019-09-16T18:25:32+5:302019-09-16T18:25:42+5:30
सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कामकाज सोमवारी दिवसभर ठप्प असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात उपविभागीय अभियंता या पदावर रुजू झालेल्या व्ही.ए. चेके यांनी मनमानी कारभार अवलंबिला असून चुकीची वागणूक देत आहेत. या निषेधार्थ ५ शाखा अभियंता व ६ कर्मचाºयांनी सामुहिक रजा आंदोलन पुकारले आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कामकाज सोमवारी दिवसभर ठप्प असल्याचे दिसून आले.
कारंजा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात उपविभागीय अभियंता या पदाचा कार्यभार स्विकारताच चेके यांनी अर्वाच्च भाषा वापरून शाखा अभियंता व कर्मचाºयांना अपमानित केले. त्यामुळेच आम्ही १६ सप्टेंबरपासून सामुहिक रजा आंदोलन पुकारत असल्याचे लेखी पत्र ५ शाखा अभियंता व ६ कर्मचाºयांनी वरिष्ठांकडे सादर केले. यामुळे मात्र बांधकाम विभागाचे कामकाज सोमवारी दिवसभर ठप्प राहिले.
कारंजा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील शाखा अभियंता व कर्मचाºयांनी सामुहिक रजा आंदोलन पुकारले; मात्र यासंदर्भात उपविभागीय अभियता चेके यांच्याकडून आपणास कुठलीही माहिती प्राप्त झालेली नाही. नेमके काय घडले, याबाबत चौकशी केली जाईल.
- सुनील कळमकर
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम