जिल्ह्यातील मतदारांनी आपल्याच पक्षाला कौल दिल्याचा सर्वच जिल्हाध्यक्षांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:00 AM2017-10-10T02:00:50+5:302017-10-10T02:00:52+5:30
वाशिम : जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीची निवडणुक पार पडल्यानंतर मतदारांनी आपल्याच पक्षाला मतदान केल्याचा दावा सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्षाकडून व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतीची निवडणुक पार पडल्यानंतर मतदारांनी आपल्याच पक्षाला मतदान केल्याचा दावा सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्षाकडून व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पाटीृचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील सुमारे १२0 सरपंच पदावर भारतीय जनता पार्टी व भाजपा सर्मथित उमेदवार सरपंच पदी निवडून आल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अँड.दिलीपराव सरनाईक यांनी मोठय़ा संख्येत सरपंच व ग्रा.पं.सदस्य निवडुन आल्याचा दावा करुन कॉगं्रेस विचाराची सरसी झाल्याचा म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ग्रामीण भागातील मतदारांनी राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सरपंच पदावर अविरोध व निवडुन आल्यामुळे मतदारांनी सत्तेवर असलेल्या राज्याच्या विरुध्द मतदान करुन रोष व्यक्त केल्याचा दावा केला आहे.शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश पाटील यांनी सुध्दा मतदारांनी शिवसेनेवर भरोसा ठेवुन चांगला विजय मिळवून दिल्याचा दावा ठोकला आहे. मात्र निवडणुक निकालावरुन मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे विकासावरुन दिसुन येते. भारतीय रिपब्लीकन पार्टी आहे. शिवसंग्राम संघटना संभाजी ब्रिगेडने तसेच स्वाभीमानी शेतकरी संघटना यांनी सुध्दा आपले खाते उघडून प्रस्थापीत पाटर्य़ांना रोखण्यात यश मिळविले आहे. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख यांचे पती दिलीप देशमुख यांनी प्रतिष्ठेच्या हिवरा गणपती व मोहजा येथील सरपंच पदावर पराभव पत्कारावा लागला.