बेलखेडा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य अपात्र!

By admin | Published: July 2, 2017 07:40 PM2017-07-02T19:40:23+5:302017-07-02T19:40:23+5:30

वाशिम : अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी बेलखेडा (ता.रिसोड) ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह इतर पाच सदस्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविले.

All the members of the Belkheda Gram Panchayat are ineligible! | बेलखेडा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य अपात्र!

बेलखेडा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य अपात्र!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात झालेले अतिक्रमण काढण्याऐवजी मर्जीतील अतिक्रमणधारकांना संरक्षण देवून पदाचा दुरूपयोग केल्याप्रकरणी गावातीलच हरिभाऊ दत्तात्रय चव्हाण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अमरावती येथील विभागीय आयुक्तांनी निर्णय देत बेलखेडा (ता.रिसोड) ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह इतर पाच सदस्यांचे सदस्यत्व अपात्र ठरविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून आयुक्तांकडे अहवाल सादर केला होता. त्यात म्हटले होते, की बेलखेडा येथील भुखंड क्रमांक ११ हा ग्रामपंचायतीने पंढरी देव्हढे आणि उत्तम देव्हढे यांना २५ वर्षांपूर्वी विकला; परंतू याबाबत ग्रामपंचायतीकडे कुठलेच रेकॉर्ड नाही. असे असताना हे अतिक्रमण हटविले नाही. ऊलट अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य करून कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन केले. पद आणि अधिकाराचा दुरूपयोग केल्याने सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३८ प्रमाणे शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे हे निष्कर्ष लक्षात घेवून विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी सरपंच भागिरथीबाई चव्हाण, उपसरपंच इंदूबाई चव्हाण, सदस्य गोविंदा ताजने, हेमंत घोडे, माधव बनसोड, लक्ष्मीबाई गायकवाड, रुख्मीनाबाई देव्हढे यांना सदस्यत्व अपात्र घोषित केले. 

 

Web Title: All the members of the Belkheda Gram Panchayat are ineligible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.