वाशिम नगरपालिकेच्या सर्वच शाळा ‘डिजिटल’
By admin | Published: April 7, 2017 03:06 PM2017-04-07T15:06:14+5:302017-04-07T15:06:14+5:30
सर्वच शाळा डिजिटल करण्यात जिल्हयात वाशिम नगरपरिषद पहिली ठरली आहे.
जिल्हयातील पहिली नगरपालिका :शिक्षण विभागाचे कार्य उल्लेखनिय!
वाशिम - नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही संगणक ज्ञानासोबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरिता वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच शाळा डिटिटल करण्यात आल्या आहेत. सर्वच शाळा डिजिटल करण्यात जिल्हयात वाशिम नगरपरिषद पहिली ठरली आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या शाळा डिजिटल करण्याबाबत शासनांचा उपक्रम होता. ३१ मार्च २०१७ पर्यंत शाळा डिजिटल करण्याबाबत शासनाचे उद्दिष्ट होते. त्यानुसार लोकवर्गणी , लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्याबाबतची मोठी चळवळ सुरु झाली व जिल्हायत सर्वप्रथम सर्व शाळा वाशिम नगरपलिकेने डिजिटल केल्यात. डिजिटल शाळांमुळे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन सुलभ झाले. विद्यार्थी पालकांचा कल नगरपरिषद शाळांकडे वाढला व स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्याां आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिकविल्या जात आहे. शाळेचा दर्जा व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वाशिम नगरपरिषदेच्या एकूण १७ शाळा असून या शाळांमध्ये ३२ इंच अॅड्रॉईड टि.व्ही व त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाचे सॉफटवेअर बसविण्यात आले आहे. या सोबतच काही शाळांमध्ये संगणक संच सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत वाशिम नगरपरिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल झाल्या असून याबाबतीत वाशिम नगरपालिका जिल्हयामध्ये पहिली ठरली आहे. सदर शाळा डिजिटल करण्यासाठी सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शासनाचे कोणतेही अनुदान नसतांना काही अंशी लोकवर्गणी व स्वत:च्या खर्चामुळे डिजिटल केल्याने मुख्याधिकारी गणेश शेटे, प्रशासन अधिकारी आकाश आहाळे यांनी सर्वांचे कौतूक केले.
नगरपरिषद वाशिम शाळांच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता व दर्जा वाढविण्यासाठी नगरपरिषद प्रशासन नेहमीच पुढाकार घेतोय. शाळा डिजिटल व्हाव्यात यासाठी नियमित आढावा घेण्यात आला. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये याची विशेष काळजी घेवून येत्या सत्रात विकासासाठी अधिक लक्ष दिल्या जाईल
-गणेश शेटे
मुख्याधिकारी, नगरपरिषद वाशिम
न.प.शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून यासाठी सर्व मुख्याध्यापक व शिक्षक पुरेपुर प्रयत्न करीत आहेत. डिजिटल शाळा झाल्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढली आहे. न.प. शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. आता प्रत्येक खोली डिजिटल करण्याचा प्रयत्न चालु आहे.
-आकाश अहाळे
प्रशासन अधिकारी, नगरपरिषद वाशिम