आघाडी सरकार म्हणजे राजकारण जास्त आणि विकासाकडे दुर्लक्ष - नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 04:29 PM2022-04-19T16:29:51+5:302022-04-19T16:31:37+5:30

Narayan Rane : राजकारण जास्त आणि विकासाकडे, जनतेकडे लक्ष कमी याला आघाडी सरकार म्हणतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

Alliance government means more politics and neglect of development - Narayan Rane | आघाडी सरकार म्हणजे राजकारण जास्त आणि विकासाकडे दुर्लक्ष - नारायण राणे

आघाडी सरकार म्हणजे राजकारण जास्त आणि विकासाकडे दुर्लक्ष - नारायण राणे

googlenewsNext

वाशिम :  राजकारण जास्त आणि विकासाकडे, जनतेकडे लक्ष कमी याला आघाडी सरकार म्हणतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.

ते १९ एप्रिल राेजी जिल्हयाच्या दाैऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत बाेलत हाेते. मुंबईत भाजपाच्या पाेलखाेल रथाच्या झालेल्या ताेडफाेड प्रकरणी म्हणाले की, शिवसेना हे बालीश उद्याेग करीत आहे. एक आमचा रथ ताेडफाेड झाला म्हणून आमचं आंदाेलन थांबणार नाही. तसेच सामनामध्ये संपादक संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना हिंदुत्ववादीचा ओवेसी आता खाेमेनी म्हटलं यावर नारायण राणे यांनी त्या व्यक्तिबद्दल प्रश्न विचारु नका. मी त्यांना संपादक समजत नाही. काय त्यांची भाषा, काय त्यांची वागणूक आहे. संपादकाला काय पगार असताे मला माहित आहे, एक संपादक रायगड किनारी प्लाट घेऊ शकताे का? असा प्रति प्रश्न केला. स्वत:च्या अधिश बंगल्यासंदर्भात माहिती देताना राणे म्हणाले की, अधिश बंगला मी खासगी जागा घेऊन , महानगरपालिकेचेी परवानगी घेऊन बांधला आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन घरात गेलाे आहे. काेणतेच चुकीचे काम केले नाही. हाे घराच्या छतावर भाजीपाला लावला ते चुकीचे केले असेल तर मला माहित नसल्याचे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मादेी यांनी हा देश आत्मनिर्भर बनावा यासाठी आतापर्यंत गेल्या ७ वर्षात विविध याेजना गाेरगरिबांसाठी , जनतेसाठी आणल्यात. अन्न पुरवठा सह गरिबांना माेफत धान्य १ लाख ७३ हजार काेटी किंमतीचे ८० काेटी जनतेला धान्य पुरवठा करणारी याेजना घाेषित केली. सर्व स्तरावरील लाेकांना , वगार्ला न्याय दिला. पंतप्रधानाचे धाेरण आणि विकास कार्याने भारत आत्मनिर्भर बनावा यातून पंतप्रधान नरेंद्र माेदी काम करताहेत. तसेच जिल्हयातील विविध याेजनांचा आढावा घेतला त्यातून समाधान व्यक्त केले व महत्वाच्या सूचना अधिकारी यांना दिल्यात. जे अधिकारी काम करणार नाहीत त्यांच्यांवर कारवाई करावी. आर्थीक सुबत्तेमध्ये वाशिम जिल्हा गणला जावा यासाठी मी काम करणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मनसेच्या भाेंगा प्रश्न, मुख्यमंत्री कॅबीनेटला न जाताच त्यांना सर्व कसं कळत यावरही राणे बाेलले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार वसंत खंडेलवाल, माजी पालकमंत्री रणजीत पाटील, राजु पाटील राजे, आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Web Title: Alliance government means more politics and neglect of development - Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.