राष्ट्रीय कुटूंब योजनेतुन  लाभार्थींना धनादेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 04:14 PM2018-04-12T16:14:38+5:302018-04-12T16:14:38+5:30

मानोरा  :  घरचा कर्ता पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसांना राष्ट्रीय कुटंूब लाभ योजनेतुन तालुक्यातील पंधरा लाभार्थ्यांना तीन लाख रुपयाचा धनादेश वाटप तहसील कार्यालयात संजय निराधाराचे अध्यक्ष निळकंठ पाटील इंगोले यांच्याहस्ते करण्यात आला.

Allocation of Checks to beneficiaries through National Family Scheme | राष्ट्रीय कुटूंब योजनेतुन  लाभार्थींना धनादेश वाटप

राष्ट्रीय कुटूंब योजनेतुन  लाभार्थींना धनादेश वाटप

Next
ठळक मुद्देतालुक्यातील पंधरा लाभार्थ्यांना प्रत्येकी विस हजार रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या छोटेखानी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निळकंठ पाटील इंगोले होते.

मानोरा  :  घरचा कर्ता पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसांना राष्ट्रीय कुटंूब लाभ योजनेतुन तालुक्यातील पंधरा लाभार्थ्यांना तीन लाख रुपयाचा धनादेश वाटप तहसील कार्यालयात संजय निराधाराचे अध्यक्ष निळकंठ पाटील इंगोले यांच्याहस्ते करण्यात आला.

तहसील कार्यालयाच्या छोटेखानी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निळकंठ पाटील इंगोले होते तर प्रमुख पाहुणे पि.झेड. भोसले  तहसीलदार भाजपाचे  तालुकाध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण, डॉ.अविनाश लोथे,  दिलीप चवहाण, उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील पंधरा लाभार्थ्यांना प्रत्येकी विस हजार रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आला. यामध्ये वेणु विष्णु बेलखडे उंबर्डा, माणिक महादेवराव मते, कोकीळा बबन जाधव, लक्ष्मी काशीराम शिंदे, मिरा रमेश घोरसडे वटफळ,  रुख्मीनाबाई अशोक  सातपुते कोलार, जनाबाई भाऊराव राठोड गिर्डा,  निशा राजेश जाधव जगदंबानगर,रश्मा विशाल पवार कारपा, पुष्पा लक्ष्मण इंगोले साखरडोह, सरला  सिध्दार्थ ढोके रामतिर्थ, पुष्पा अंबादास गोदमले रुई, मिराबाई उकंडा राठोड खापरदरी, आशा अशोक शिंदे धामणी , पुष्पा चरण कांबळे कोलार यांना धनादेश वाटप करण्यात आला.  

Web Title: Allocation of Checks to beneficiaries through National Family Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.