दिव्यांग सेवा समितीच्यावतीने कापड वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 08:04 PM2017-10-05T20:04:15+5:302017-10-05T20:04:33+5:30
मंगरुळपीर : दिव्यांगाच्या न्याय हक्क अधिकार व सन्मानासाठी सतत अतितीव्र लढा देणाºया दिव्यांग सेवा समितीच्यावतीने समितीच्या कार्यालयावर तालुक्यातील लावणा येथे अति गरीब अपंग कुटूंबांना कापड वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावेळी अपंगांच्या घरी दिव्यांग सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी जावुन कुटूंबाबाबतची समस्या जाणुन घेतली. त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नसुन ग्रामीण पातळीवरील लोकप्रतिनिधींनी त्यांच्याकडे लक्ष देवुन त्यांना लाभ द्यावा याबाबत दिव्यांग सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष मोबीसिंग राठोड यांनी विसतार अधिकारी पं.स.मंगरुळपीर यांचेसोबत चर्चा केली असता विस्तार अधिकाºयांनी संबंधीत अपंग कुटंूबांना शासकीय नियमानुसार सर्व सोयीसवलीचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी सेवा समितीचे विदर्भ अध्यक्ष सुभाष इंगोले, जिल्हाध्यक्ष भारत पाटील, कार्यकारी अध्यक्ष प्रशांत डहाके, विधानक्षेत्र प्रमुख राधेशाम जाधव, अनिल जाधव, माणिक वºहाडे, वाहेद खान, जितेंद्र भगत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.