दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे वाटप सुरू

By admin | Published: January 22, 2015 12:12 AM2015-01-22T00:12:13+5:302015-01-22T00:12:13+5:30

मंगरूळपीर तालुक्यातील १६ हजार ९९६ शेतक-यांना लाभ; पहिल्या टप्यात ९९ गावांचा समावेश.

Allocation of help to drought-hit farmers continues | दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे वाटप सुरू

दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचे वाटप सुरू

Next

साहेबराव राठोड/ मंगरूळपीर (जि. वाशिम):
खरीप हंगामात अपुर्‍या पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील १३८ गावातील ३८ हजार ४0४ शेतकर्‍यांपैकी ९९ गावातील १६ हजार ९९६ शेतकर्‍यांना पहिल्या टप्यात प्राप्त झालेल्या ८ कोटी ५0 लाख निधीचे वितरण सुरू झाले असून दोन दिवसात जवळपास दोन कोटी रूपये लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार बळवंत अरखराव यांनी दिली आहे.
९९ गावातील बॅक खाते प्राप्त झालेल्या १६ हजार ९९६ शेतकर्‍यांचा समावेश पहिल्या यादीत करण्यात आला असून शेतकर्‍यांच्या १८ हजार ५६६ हेक्टर १४ आर ऐवढय़ा नुकसान क्षेत्रानां पहिल्या टप्याचा लाभ दिल्या जाणार आहे.
खरिप हंगामात अत्यल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे हा हंगाम तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी नुकसानकारक ठरले होते. नापिकीमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रोजगार मिळेनासे झाला आहे. नापिकीचे परिणाम बाजारपेठेवर सुध्दा आढळून येत आहे. अपुर्‍या प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका बसल्यानंतर शासनाने मंगरूळपीर तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून मदत देण्याचे जाहीर केले होते.
अपेक्षित २0 कोटी रक्कमेपैकी ८ कोटी ५0 लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला असून ज्या शेतकर्‍यांनी बँॅक खाते क्रमांक तलाठय़ाकडे सादर केला, त्या शेतकर्‍यांना पहिल्या टप्यातील प्राप्त निधीचा लाभ देणे सुरू झाले आहे.
तहसीलदार बळवंत अरखराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्याला प्राप्त झालेल्या ८ कोटी ५३ लाख निधीचे नियोजन करून ज्या शेतकर्‍यांची बँक खाती महसूल विभागाकडे प्राप्त झाली असल्याचे सांगीतले. दुष्काळग्रस्त मदतीपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सर्व तलाठय़ांना शेतकर्‍याकडील बँक खाते घेवून सादर करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Allocation of help to drought-hit farmers continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.