अगोदरच विलंब; त्यातही विहिर बांधकामांचे कार्यारंभ आदेश मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:18 PM2019-01-29T14:18:29+5:302019-01-29T14:18:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड ( वाशिम ) : सन २०१८-१९ या वर्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना प्रशासकीय ...

Already Delay; work order of the well construction not received! | अगोदरच विलंब; त्यातही विहिर बांधकामांचे कार्यारंभ आदेश मिळेना !

अगोदरच विलंब; त्यातही विहिर बांधकामांचे कार्यारंभ आदेश मिळेना !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : सन २०१८-१९ या वर्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना प्रशासकीय दिरंगाई आणि पदाधिकाºयांच्या डावपेचात अडकली आहे. एका महिन्यापूर्वी ईश्वरचिठ्ठीतून निवड झालेल्या लाभार्थींना अद्याप विहिर बांधकामासंदर्भात कार्यारंभ आदेश मिळाले नसल्याने ३१ मार्च २०१९ पूर्वी बांधकाम पूर्ण कसे करावे, असा प्रश्न लाभार्थींना गटविकास अधिकाºयांकडे उपस्थित केला आहे.
अनु. जाती तसेच अनु. जमातीलमधील शेतकºयांचे जीवनदान उंचाविण्यासाठी  डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. सन २०१८-१९ या वर्षात या योजनेंतर्गत लाभार्थींची निवड प्रक्रिया प्रचंड दिरंगाईने राबविण्यात आली. डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या सभागृहात ईश्वर चिठ्ठीतून लाभार्थींची निवड झाल्यानंतर तातडीने कार्यारंभ आदेश मिळणे पात्र लाभार्थींना अपेक्षीत होते. मात्र, अद्याप कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी विहिर बांधकाम पूर्ण कसे करावे, या विचाराने शेतकºयांची झोप उडाली आहे. ईश्वर चिठ्ठीतून निवड झाल्यानंतरही लाभार्थी निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने यामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप लाभार्थींनी केला. मागासवर्गीय शेतकºयांच्या योजनेत व्यत्यय निर्माण करून ही योजना रखडविली जात असल्याचा आरोपही होत आहे. या पृष्ठभूमीवर निवड झालेल्या लाभार्थींना विहिर बांधकाम सुरू करण्यासंदर्भात तातडीने आदेश देण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारिप-बहुजन महासंघ शाखा रिसोड तालुका व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांनी २८ जानेवारी रोजी गटविकास अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे दिला. मागासवर्गीय शेतकºयांवर अन्याय होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी याप्रकरणी लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकºयांसह भारिप-बमसंच्या पदाधिकाºयांनी केली.

Web Title: Already Delay; work order of the well construction not received!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.