आंबेडकरांची मोठेगावला सांत्वनपर भेट
By admin | Published: March 16, 2017 02:54 AM2017-03-16T02:54:55+5:302017-03-16T02:54:55+5:30
महिलेवर बलात्कार करून तिला अमानुषपणे जिवंत जाळल्याप्रकरणी बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठेगावला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.
रिसोड, दि. १५-तालुक्यातील मोठेगाव येथील ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला अमानुषपणे जिवंत जाळल्याप्रकरणी भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी १५ मार्च रोजी मोठेगावला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. मोठेगाव येथील ३५ वर्षीय महिलेवर सात इसमांनी बलात्कार करून पेटवून दिल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. या घटनेतील सर्व दोषींविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारिप-बमसंतर्फे जिल्हाध्यक्ष मो. युसूफ पुंजाणी यांनी पोलीस अधीक्षकांकडे १४ मार्च रोजी केली. त्यानंतर १५ मार्च रोजी भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठेगाव येथे भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी मोठेगाव येथील सर्व परिस्थितीची माहिती अँड. आंबेडकर यांनी जाणून घे तली. या घटनेतील सर्व दोषींविरूद्ध कारवाई करावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणीही अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष मो. युसूफ पुंजाणी, कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.