मेडशी आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका नादुरूस्त; रूग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 04:11 PM2018-06-04T16:11:45+5:302018-06-04T16:11:45+5:30
मेडशी : मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. रूग्णवाहिका दुरूस्ती होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी सोमवारी केली.
मेडशी : मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. रूग्णवाहिका दुरूस्ती होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी सोमवारी केली.
मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सात उपकेंद्र येतात. या उपकेंद्रांतर्गत बहुतांश खेडी आहेत. आदिवासी बहुल गावातील रूग्णांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी म्हणून मेडशी आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचा मोठा आधार मिळतो. या परिसरातील महिला रूग्णांना प्रसुतीसाठी मेडशी आरोग्य केंद्र फायदेशीर ठरत आहे. गर्भवती महिलांना रूग्णवाहिकेद्वारे मेडशी आरोग्य केंद्रात आणण्यासाठी तसेच मातांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची नितांत गरज आहे. मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिम ते अकोला या महामार्गावर असल्याने अपघातातील जखमींना रूग्णालयापर्यंत आणण्यासाठीदेखील रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. रूग्णवाहिका नादुरूस्त असतानाही, दुरूस्तीसाठी अद्याप कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. येथील १०८ क्रमांकाची रूग्णवाहिकादेखील दुसºया ठिकाणी हलविण्यात आली. त्यामुळे सात उपकेंद्रातील ३४ गावांतील रूग्णांची जबाबदारी एका नादुरूस्त रूग्णवाहिकेवर आहे. रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने रूग्ण व नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांवर आली आहे. लोकप्रतिनिधींनी तसेच वरिष्ठ अधिकाºयांनी पाठ फिरविल्याने रूग्णांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागतो. रूग्णवाहिका दुरूस्ती होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी केली.