प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला चालकच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 04:46 PM2019-08-24T16:46:58+5:302019-08-24T16:47:05+5:30
धनज बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका ही चालकाविना े गत ४ वर्षापासून उभी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धनज बु. : कारंजा तालुक्यातील सर्वातमोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असणारे धनज बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका ही चालकाविना े गत ४ वर्षापासून उभी आहे. महत्वाचे कामाच्यावेळी खासगी चालकाला बोलावून येथील कारभार चालविल्या जात असल्याने रुग्णांना याचा काहीच फायदा होतांना दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
यापुर्वी असलेल्या चालकाची बदली झाल्यानंतर या रुग्णवाहीकेला सध्या खाजगी चालकाच्या साहाय्याने चालविल्या जात आहे. त्यामुळे रात्री अपरात्री एखादया रुग्णाला अमरावती येथे हलविण्याचे काम पडले तर त्यावेळी येथे कुठला ही चालक उपलब्ध नाही आहे.
बºयाचवेळा खाजगी चालक उपस्थित नसल्यामुळे रुग्णांना खाजगी वाहनाच्या साहाय्याने अमरावती येथे न्यावे लागते , त्यामुळे याच ाभुर्दंड हा रुग्णाच्या नातवाईकांना पडतो. त्यामूळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहीका असून त्याचा वेळप्रसंगी कुठलाही उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे. तसे पाहता या रुग्णवाहीकेला सन २०११-१२ पासून चालकर नाही आहे परंतु २०१६-१७ दरम्यान फक्त सहा महिन्यासाठी चालकाची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्या चालकाची बदली झाल्यामुळे सध्या ही रुग्णवाहिका चालविण्यासाठी कोणीच नसल्याने तशीच उभी राहत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी या बाबीकडे त्वरित लक्ष देवून पुर्णवेळ चालक नियुक्त करावा त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही अशी मागणी होत आहे.