धनज प्राथमिक आरोग्यवार्धिनी केंद्राला मिळाली रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:10+5:302021-04-18T04:40:10+5:30
नीती आयोगांतर्गत सामाजिक विकास निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र धनज ला जिल्हा परिषद अध्यक्ष श्यामभाऊ गाभाने यांच्या हस्ते रुग्णवाहिका ...
नीती आयोगांतर्गत सामाजिक विकास निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र धनज ला जिल्हा परिषद अध्यक्ष श्यामभाऊ गाभाने यांच्या हस्ते रुग्णवाहिका भेट देण्यात आली आहे.
धनज बु. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर म्हस्के यांना रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य सभापती चक्रधर गोटे हे सुद्धा उपस्थित होते.
तसेच १७ एप्रिलला प्राथमिक आरोग्य केंद्र धनज बु. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर म्हस्के यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेत दाखल करण्यात आली. यावेळी रुग्णवाहिकेचे पूजन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे, पंचायत समिती सदस्य मयूर म्हस्के, धनज खुर्द येथील पं. स. सदस्य वर्षा गवई, सरपंच परवीन मोटलानी, उपसरपंच प्रवीण ढाकरे, डॉ. सागर म्हस्के, डॉ वैभव कौलखेडे, आरोग्यसेवक सुरेंद्र उमक, डॉ. सुभाष धांडे, दिलीप टाके, मोरेश्वर चांदेकर, दिलीप टाके, जिकर मोटलानी, धनंजय रिठे, धनराज गवई, सुमित तवार, किशोर देशमुख, किरण तुपाडे, अस्लम, रोशन शेंदुरशे, सुरज मोरे, कैलास वाळले यावेळी उपस्थित होते.