वाशिम जिल्ह्यात रूग्णवाहिकेची सेवा कोलमडली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:36 PM2019-12-25T13:36:15+5:302019-12-25T13:36:26+5:30
बहुतांश शासकीय रुग्णवाहिका खिळखिळ्या झाल्या असून, त्यांच्या मेंटनन्सकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय रुग्णवाहिकेची सेवा कोलमडली आहे. गंभीर जखमींवर उपचारासाठी सुरू केलेल्या १०८ या रूग्णवाहिकेसह ईतर शासकीय रूग्णवाहिकाही तांत्रिक बिघाड आणि रिक्त पदांमुळे उपलब्ध होणे कठीण झाले आहे.
आपत्कालीन सेवा देणाº्या बहुतांश शासकीय रुग्णवाहिका खिळखिळ्या झाल्या असून, त्यांच्या मेंटनन्सकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्त यांच्याकडून रुग्णसेवाच्या मेंटनन्ससंदर्भात विशेष सूचनादेखील देण्यात येतात; परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष होत असून, आरोग्य विभागाकडून नियमित आढावा घेण्यात येत नाही. रुग्णवाहिका ही रुग्णांसाठी जीवनदायिनी आहे. आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर पोहोचून रुग्णवाहिका दररोज शेकडो प्राण वाचविते; पण खराब रस्ते अन् सरकारी यंत्रणेच्या तिच्या मेंटनन्सकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे या रुग्णवाहिकांनाच उपचाराची गरज आहे. शासकीय यंत्रणेंतर्गत गर्भवतींसाठी ग्रामीण भागात १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका मोलाची भूमिका बजावते; परंतु खिळखिळ्या अवस्थेतील या रुग्णवाहिकेत गर्भवतींचा प्रवास वेदनादायकच होत आहे. शिवाय, आवश्यक सुविधांचाही अभाव आहे. यासोबतच दररोज शेकडो प्राण वाचविणारी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेलाही मेंटनन्सअभावी उपचाराची गरज भासू लागली आहे. नादुरुस्त असल्या तरी रस्त्यावर धावताहेत, प्रशासन रुग्णवाहिकांच्या मेंटनन्सकडे दुर्लक्ष होत आहे. हा प्रकार रुग्णांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिकांची संख्या ११ असून यातील रिसोड गमीण रूग्णालयातील रूग्णवाहिका नादुरूस्त आहे. त्याशिवाय या रूग्णवाहिकांवर स्वत्तंत्र डॉक्टर आवश्यक असताना १२ तासांच्या दोन पाळ्यांसाठीही डॉक्टरांची संख्या अपूरी असून, सद्यस्थितीत या रूग्णवाहिकांसाठी केवळ १६ डॉक्टर उपलब्ध आहेत. अर्थात १०८ रूग्णवाहिकांसाठी डॉक्टरांचा किमान ६ पदे रिक्त आहेत. १०२ या रूग्णवाहिका ३४ आहेत. त्यापैकी मेडशी, शिरपूर, धामणी,मानोरा आणि मंगरूळपीर येथील मिळून ५ रूग्णवाहिका गेल्या १५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून नादुरूस्त आहेत. त्यामुळे गोरगरीब गंभीर आजारी रूग्णा, गर्भवती महिलांना वेळेवर आरेग्य सुविधा मिळणे कठीण झाले आहे.
१५ दिवसांपासून रूग्णवाहिका बंद
जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, १०२ क्रमांका्च्या एकूण ३४ रूग्णवाहिका आहेत. त्यापैकी मेडशी, शिरपूर, धामणी, मानोरा व मंगरूळपीर येथील पाच रुग्णवाहिका १५ दिवसांपासून नादुरूस्त आहेत. त्यामुळे १५० पेक्षा अधिक रूग्णांना खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागला.
१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका ११ आहेत. यापैकी रिसोड येथील रुग्णवाहिका बंद तर अन्य तीन रुग्णवाहिका तांत्रिक कारणामुळे अधूनमधून बंद असतात. रिसोड तालुक्यात जवळपास ८२ गावे येतात. ४१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी सहा डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने जवळपास तीन रुग्णवाहिकाही सुरळीत सेवा देण्यात अपूऱ्या पडत आहेत. ४जिल्ह्यातील रुग्णवाहिकेच्या दुरूस्तीकडे तसेच सेवेकडे अधिक लक्ष दिले जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.