रुग्णवाहिका उभी राहते रिसोडपासून २५ किलोमिटर अंतरावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 05:48 PM2018-03-27T17:48:55+5:302018-03-27T17:48:55+5:30

रिसोड (वाशिम) : आरोग्य विभागाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रिसोडपासून २५ किलोमिटर अंतरावर असलेल्या रिठद येथे उभी राहत असून ती ऐनवेळी येण्यास विलंब लावत असल्याने रुग्णांना उपचारासाठी इतरत्र हलविताना मोठा प्रश्न उभा राहत आहे.

Ambulance stands at a distance of 25 kilometers from Risod! | रुग्णवाहिका उभी राहते रिसोडपासून २५ किलोमिटर अंतरावर!

रुग्णवाहिका उभी राहते रिसोडपासून २५ किलोमिटर अंतरावर!

Next
ठळक मुद्देतालुक्यातील १०७ गावांपैकी रिसोडला जोडून असलेल्या गावांसह शहरातील रुग्णांचा ग्रामीण रुग्णालयाशी आरोग्यविषयक दैनंदिन संबंध येतो.ग्रामीण रुग्णालयाकडे स्वतंत्र १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नसल्याने रिठद आणि केशवनगर येथे असणाºया रुग्णवाहिकेस बोलाविले जाते. मात्र, या रुग्णवाहिकेस येण्यास विलंब लागत असल्याने रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे प्रकार घडले आहेत.

- शीतल धांडे
रिसोड (वाशिम) : तालुक्यातील १०७ गावांचा दैनंदिन आरोग्यविषयक संबंध येणाºया येथील ग्रामीण रुग्णालयास अपघातांमध्ये गंभीर जखमी होणाºया रुग्णांकरिता स्वतंत्र रुग्णवाहिकेची गरज भासत आहे. असे असताना आरोग्य विभागाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रिसोडपासून २५ किलोमिटर अंतरावर असलेल्या रिठद येथे उभी राहत असून ती ऐनवेळी येण्यास विलंब लावत असल्याने रुग्णांना उपचारासाठी इतरत्र हलविताना मोठा प्रश्न उभा राहत आहे. अशाप्रसंगी जखमींच्या नातेवाईकांना नाईलाजास्तव खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 

तालुक्यातील १०७ गावांपैकी रिसोडला जोडून असलेल्या गावांसह शहरातील रुग्णांचा ग्रामीण रुग्णालयाशी आरोग्यविषयक दैनंदिन संबंध येतो. असे असताना या रुग्णालयात कर्मचारी अनुशेष, सुविधांचा अभाव असण्यासोबतच रुग्णालयास अद्याप अपघाताप्रसंगी वापरता यावी, अशी हक्काची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका मिळालेली नाही. यामुळे अधूनमधून घडणाºया अपघातांमध्ये गंभीर जखमी होणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ऐनवेळी त्रेधातिरपिट उडत आहे. ग्रामीण रुग्णालयाकडे स्वतंत्र १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नसल्याने जखमी अवस्थेतील रुग्णांना वाशिम अथवा अकोला येथील रुग्णालयात हलविण्याचा प्रसंग उद्भवल्यास रिठद आणि केशवनगर येथे असणाºया रुग्णवाहिकेस बोलाविले जाते. मात्र, या रुग्णवाहिकेस येण्यास विलंब लागत असल्याने रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे प्रकार यापुर्वी अनेकवेळा घडले आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बºयापैकी असलेल्या रुग्णांचे नातेवाईक खासगी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून वाशिम अथवा अकोला येथील रुग्णालय गाठत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, ही समस्या निकाली काढण्याकरिता विद्यमान लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने जाणीवपूर्वक लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे. 

रिसोडच्या ग्रामीण रुग्णालयाकडे १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका आहे. मात्र, ही रुग्णवाहिका गर्भवती मातांना ने-आण करण्यासाठी वापरली जाते. रुग्णवाहिका उपलब्ध असल्यास अपघातांमधील जखमींचीही मदत केली जाते. 
- डॉ. श्रीधर चोपडे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, रिसोड

Web Title: Ambulance stands at a distance of 25 kilometers from Risod!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.