..अखेर रुग्णवाहिका परत मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:46 AM2021-08-14T04:46:36+5:302021-08-14T04:46:36+5:30
दैनिक लोकमतच्या वृत्ताची दखल घेत शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी प्राथमिक मोप आरोग्य केंद्राला वीस दिवसांपूर्वी प्रत्यक्ष ...
दैनिक लोकमतच्या वृत्ताची दखल घेत शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी प्राथमिक मोप आरोग्य केंद्राला वीस दिवसांपूर्वी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी रुग्णवाहिकेसंदर्भात चर्चा झाली असता काही दिवसात आपण रुग्णवाहिका मिळवून देऊ, असे आश्वासन गोटे यांनी दिले होते. त्याची पूर्तता होत असताना १० ऑगस्ट रोजी क्विक हील कंपनीकडून दोन रुग्णवाहिका वाशिम जिल्ह्याला प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी एक रुग्णवाहिका या आरोग्य केंद्रासाठी देण्यात आली . या रुग्णवाहिकेचे लोकार्पण १२ ऑगस्ट रोजी रिसोड मतदार संघाचे आ. अमित झनक, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी संतोष जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच ॲड. भागत नरवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फोपसे, वैद्यकीय अधिकारी डॉ, सिंग, डॉ. तुरूकमाणे, आरोग्य सहाय्यक गजानन पदमने यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.