जलयुक्त शिवार कामांबाबत अधिकाºयांशी चर्चा करणार - अमित झनक
By admin | Published: May 5, 2017 07:24 PM2017-05-05T19:24:37+5:302017-05-05T19:24:37+5:30
अनेक ठिकाणावरील प्रकल्पांमध्ये, नाल्यांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जलसाठा दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
शिरपूर :जिल्हयात अनेक ठिकाणी गतवर्षि जलयुक्त शिवार कामांतर्गंत नदया , नाली खोलीकरण करण्यात आले. शासनाची अतिशय महत्वपूर्ण व महत्वाकांक्षी योजनेत काही ठिकाणी व्यवस्थित काम न झाल्याने अनेक ठिकाणावरील प्रकल्पांमध्ये, नाल्यांमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जलसाठा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात लोकमतच्यावतिने ५ मे रोजी वृत्त प्रकाशित करताच रिसोड विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित झनक यांनी दखल घेवून या संदर्भात आपण संबधित अघिकारी, विभागाचे मंत्री यांच्याशी संपर्क करुन सदर बाब निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले.
जलयुक्त शिवार कामांतर्गंत पाणीसाठी शिल्लक रहावा याकरीता शासनाच्यावतिने जलयुक्त शिवाराची कामे मोठया प्रमाणात जिल्हयात करण्यात आली. पावसाळयात तुडूंब वाहणारे नाले मात्र उन्हाळा लागल्याबरोबर कोरडी पडली आहेत. यासंदर्भात मालेगाव तालुक्यातील झालेल्या नाला खोलीकरणाची उंची व रुंदी कमी असल्याने यामध्ये पाणी साठा शिल्लक नसल्याची बाब पुढे आली आहे. शिरपूरनजिक असलेल्या वाघी खु येथे नाला खोलीकरण करण्यात आले होते. येथे मार्च महिन्यापर्यंत पाणी होते. याची खोली थोडी जास्त असतील तर मेमध्ये सुध्दा यामध्ये पाणी राहु शकले असते. परंतु त्यावेळी यावर लक्ष केंद्रीत करण्यात न आल्याने सदर नाले कोरडी पडली आहेत. या वृत्ताची दखल आमदार अमित झनक यांनी घेवून सदर कामाची खोली वाढविण्याबाबत संबधित विभागचे मंत्री महोदय व अधिकारी यांच्याश्ी चर्चा करणार असल्याची माहिती झनक यांनी दिली.