पीक कर्जाची रक्कम बँकेत पडून !

By admin | Published: May 23, 2017 05:55 PM2017-05-23T17:55:13+5:302017-05-23T17:55:13+5:30

समस्येवर तत्काळ तोडगा न निघाल्यास हंगामही धोक्यात

The amount of crop loans fall into the bank! | पीक कर्जाची रक्कम बँकेत पडून !

पीक कर्जाची रक्कम बँकेत पडून !

Next

वाशिम : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला असला तरी रोकड तुटवड्यामुळे मंजूर पीक कर्जाची रक्कम बँकेतून "विड्रॉल" करणे अशक्य ठरत आहे. परिणामी, ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असून या समस्येवर तत्काळ तोडगा न निघाल्यास हंगामही धोक्यात सापडणार असल्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे. 
यंदा जिल्ह्यातील १.५ लाख शेतकऱ्यांसाठी ११५० कोटी रुपये कर्ज वितरणाची तरतूद करण्यात आली. काही शेतकऱ्यांना कर्ज मंजूर देखील झाले. कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात येत असली तरी, तो पैसा ह्यएटीएमह्णमधून काढावा लागत असून बँकांकडे एटीएममध्ये टाकण्यास पुरेशी रक्कमच नसल्याने शेतकरी आणि बँकांची मोठी पंचाईत झाली आहे. प्रामुख्याने अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेला या अडचणीचा सामना करावा लागत आहे. 
सद्या खरीप हंगामासाठी बँकांमार्फत शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात विविध बँकांचे एकूण १ लाख ९८ हजार ५४० शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी १ लाख ६२ खातेदार पिककर्जासाठी पात्र आहेत. यावर्षी सर्व  बँका मिळून ११५० कोटी रुपयांचे पीककर्ज शेतकऱ्यांना वितरित करणार आहेत. पिककर्जाची रक्कम रोखीने न देता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना सर्वाधिक कर्जपुरवठा करणारी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या ह्यरूपे केसीसीह्ण कार्डवर पैसे जमा करीत आहे. आता ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या एटीएममधून काढावी लागते आणि एटीएममध्ये टाकण्यासाठी बँकेकडे पुरेसे पैसेही नाहीत. बँकेच्या वाशिम येथील मुख्य शाखेला त्यांच्या दिवसभराच्या व्यवहारासाठी १० लाख रुपये मिळतात. यातील काही रक्कम त्यांना एटीएममध्ये टाकावी लागते. त्यातच त्यांच्या एटीएममध्ये केवळ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाच टाकणे शक्य असून, त्यांना स्टेट बँकेकडून मिळणाऱ्या १० लाखाच्या रकमेत सर्वच नोटांचे कमी अधिक प्रमाण असते. हीच स्थिती इतरही बँकांची असल्यामुळे त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर जाणवत असल्याचे दिसत आहे.

Web Title: The amount of crop loans fall into the bank!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.