रक्कम थकविली; एकाच वेळी ४७ दुकानांना ठोकले सील
By दिनेश पठाडे | Published: March 19, 2024 05:10 PM2024-03-19T17:10:05+5:302024-03-19T17:11:16+5:30
वाशिम न.प.ची कार्यवाही; अधिमूल्य रक्कम भरण्याच्या सूचना.
दिनेश पठाडे, वाशिम : नगर परिषद वाशिम मालकीच्या अकोला नाका स्थित व्यापारी संकुलातील अधिमूल्य रक्कम थकीत असलेल्या ४७ गाळ्यांवर कारवाई करुन मंगळवारी या दुकानांना सील ठोकण्यात आले आहे.
अकोला नाका येथे नगर परिषदच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलात एकूण १९४ गाळे आहेत. त्यापैकी ४७ गाळेधारकांनी अग्रिम भरुन उर्वरित अधिमुल्य रक्कम पूर्ण न भरणाच्या सूचना वेळोवेळी संबंधित दुकानदारास देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने दि.१९ मार्च रोजी नगर परिषदच्या पथकाने गाळेधारकांकडे असलेली थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्यात आली. यावेळी अधिमूल्य रक्कम पूर्ण न भरणाऱ्या ४७ गाळेधारकांवर कार्यवाही करीत त्यांचे गाळे नगर परिषद मार्फत सील करण्यात आले. थकीत अधिमुल्य रक्कम न भरल्यास गाळ्यांचा पुन्हा लिलाव करण्याचा इशारा नगर परिषदने दिला आहे. ही कार्यवाही मुख्याधिकारी तथा प्रशासक अपूर्वा बासर(भा.प्र.से), मालेगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख शहर अभियंता अशोक अग्रवाल यांच्या पथकाने केली.