सोयाबीन अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:41 PM2017-11-24T22:41:45+5:302017-11-24T22:49:01+5:30

वाशिम जिल्ह्यातील पात्र ४४ हजार ६१८ लाभार्थ्यांना अनुदान वितरणास सुरुवात झाली असून पात्र शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा झाल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे.

The amount of soybean donation started in the bank account of the farmers! | सोयाबीन अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रारंभ!

सोयाबीन अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रारंभ!

Next
ठळक मुद्दे४४ हजार ६१८ शेतकरी१४.७९ कोटी रुपये अनुदानाचे होणार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम: आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय १० जानेवारी २०१७ रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यातील पात्र ४४ हजार ६१८ लाभार्थ्यांना अनुदान वितरणास सुरुवात झाली असून पात्र शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा झाल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे.

२०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे बाजारातील आवक वाढून दरात घसरण झाली. त्यामुळे १ आॅक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत आडत व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे २५ क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या व अनुदानास पात्र ठरलेल्या ४४ हजार ६१८ शेतकºयांना १४ कोटी ७९ लक्ष १३ हजार ५९४ रुपये रक्कमेचे वाटप करण्यात येणार आहे. 

Web Title: The amount of soybean donation started in the bank account of the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.