अमरावती विभागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 03:19 PM2019-06-30T15:19:31+5:302019-06-30T15:20:35+5:30
वाशिम: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत २ ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत २ ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला असून, यात यवतमाळ जिल्ह्यात २ जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. संभाव्य आपत्तीसाठी सज्ज राहण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांत २ जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीसाठी प्रशासनाला सर्तक राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अमरावती जिल्ह्यात २ ते ३ जुलैदरम्यान, तर अकोला, बुुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात ३ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सुचनाही हवामान खात्याच्यावतीने प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जोरदार पावसाची प्रतिक्षा करणाºया बुलडाणा, वाशिम, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह जनतेसाठी ही दिलासा देणारी बाब ठरणार असून, खरीप हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.