वाशिम शहरात अमृत कलश यात्रा, मुठभर माती आणि मुठभर तांदुळ गोळा करणार
By दिनेश पठाडे | Published: September 19, 2023 05:00 PM2023-09-19T17:00:46+5:302023-09-19T17:01:21+5:30
"माझी माती माझा देश" अभियानातंर्गत १९ सप्टेंबर रोजी नगर परिषदच्या वतीने शहरातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली.
वाशिम : "माझी माती माझा देश" अभियानातंर्गत १९ सप्टेंबर रोजी नगर परिषदच्या वतीने शहरातून अमृत कलश यात्रा काढण्यात आली. शहरातील प्रत्येक वार्डातून अमृत कलश यात्रेचे आयोजन नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून केले जाणार असून प्रत्येक कुटुंबांनी अमृत कलशामध्ये मुठभर माती व मूठभर तांदुळ गोळा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अमृत कलश यात्रेत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड, सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, निवासी नायब तहसीलदार साहेबराव नपते, मुख्याध्यापक नंदकिशोर मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. म्हणाल्या की, या अभियानात शहरातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे, प्रत्येक वार्डातून अमृत कलश यात्रेचे आयोजन नगर परिषदेच्या वतीने करावे अशा सूचना दिल्या. प्रत्येक कुटुंबांनी अमृत कलशामध्ये मुठभर माती व मूठभर तांदुळ गोळा करण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शहरातून काढण्यात आलेल्या अमृत कलश यात्रेत शहरातील नागरिक, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगरपरिषदेच्या शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.चौकाचौकात अमृत कलश यात्रेचे स्वागत करण्यात आले.