अनंतराव देशमुख गटच ठरला अव्वल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:57 AM2017-10-10T01:57:52+5:302017-10-10T01:57:56+5:30
रिसोड: तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी २ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ४३ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या ९ ऑक्टोबरला जाहीर झालेल्या निकालात अधिकांश ग्रामपंचायतींमध्ये माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्याच गटाचे उमेदवार निवडून आल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

रिसोड येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात सकाळी १0 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. यंदा प्रथमच सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार होते. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्साह होता. दरम्यान, आज मतदान केंद्रावर ज्या ग्रामपंचायतीची मतमोजणी होत होती, त्यातून विजयी होणार्या उमेदवारांच्या सर्मथकांकडून जल्लोष करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तालुक्यातील बाळखेड, आसोला, ढोणी, गट ग्रामपंचायत निजामपूर, बोरखेर्डी, देगाव, येवता या ग्रामपंचायतच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याची नजर लागून होती. निवडणुक विशेष अधिकारी तथा तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्रात चोख जबाबदारी ठेवण्यात आली. याप्रसंगी पोलिस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता. नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांनी माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, खासदार भावना गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयावर भेटी देवून आनंदोत्सव साजरा केला.