...अन् ते कर्मचारी निवासस्थान झाले ‘भूत बंगला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 02:49 PM2019-05-12T14:49:40+5:302019-05-12T14:49:50+5:30

आता तर या इमारतीची ओळख चक्क ‘भूत बंगला’ अशी झाली असून रात्रीच्या वेळी या इमारतीकडे कुणी भटकण्याची हिंमतही करित नाही.

... and the employee quarters become 'ghost bungalow' | ...अन् ते कर्मचारी निवासस्थान झाले ‘भूत बंगला’

...अन् ते कर्मचारी निवासस्थान झाले ‘भूत बंगला’

googlenewsNext

- बबन देशमुख 
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : कर्मचारी मुख्यालयी राहावे, या उद्देशाने लाखो रुपये खर्चून येथे उभारण्यात आलेल्या टोलेजंग शासकीय कर्मचारी निवासस्थानात वास्तव्य करायला कुणी तयार नाही. आता तर या इमारतीची ओळख चक्क ‘भूत बंगला’ अशी झाली असून रात्रीच्या वेळी या इमारतीकडे कुणी भटकण्याची हिंमतही करित नाही.
चिंतामणी विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या या इमारतीचे दरवाजे, खिडक्या, काच पूर्णत: तुटले आहेत. पाणीटंचाईच्या मुख्य कारणामुळे या इमारतीत वास्तव्य करायला कर्मचारी तयार नव्हते. सद्या मात्र मुबलक पाणी असूनही या इमारतीचे भकासलेपण दुर झालेले नाही. आता तर ‘भूत बंगला’ अशी ओळख झालेल्या या इमारत परिसरात रात्रीच्या सुमारास जायची कुणी हिंमत देखील करित नाही.
दुरूस्तीसाठी पाच लाखांची गरज
मानोरा शहरातील विनावापर पडून असलेल्या शासकीय कर्मचारी निवासस्थानांच्या इमारत दुरूस्तीसाठी पाच लाख रुपयांची गरज असून तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शेषराव बिल्लारी यांनी ‘लोकमत’ला दिली.

 

Web Title: ... and the employee quarters become 'ghost bungalow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.