...अन् चोरट्याने चक्क अकोला आगाराची बस पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 02:24 PM2018-11-02T14:24:27+5:302018-11-02T14:24:35+5:30

वाशिम: राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) अकोला येथील अकोला-१ आगाराची बस लंपास करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने १ नोव्हेंबरच्या रात्री केला.

... and thieves ran away with the bus of akola depot | ...अन् चोरट्याने चक्क अकोला आगाराची बस पळविली

...अन् चोरट्याने चक्क अकोला आगाराची बस पळविली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) अकोला येथील अकोला-१ आगाराची बस लंपास करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने १ नोव्हेंबरच्या रात्री केला. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून ही बस वेगात पळविण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना रस्त्याच्या कडेला उलटल्याने चोरट्याला बस सोडून पळावे लागले. हा प्रकार मंगरुळपीरनजिकच्या गोलवाडी येथे २ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आला.
अकोला-२ आगारात रात्री उभी असलेली एमएच-१४, ०६४२ क्रमांकाची बस अज्ञात चोरट्याने चालवत मंगरुळपीर येथे आणली. त्यानंतर ही बस मंगरुळपीरहून वाशिमकडे नेण्याचा त्याचा प्रयत्न होता. दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरु असून, यामध्येच मंगरुळपीर-वाशिम मार्गाच्या कामाचा समावेश आहे. या मार्गावर मंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडीनजिक रस्त्याच्या कामासाठी रस्त्याच्या कडेलाच खोदकाम करण्यात आले आहे. याच ठिकाणाहून चोरट्याने वेगाने बस चालवितानाच चुकीच्या मार्गाने समोरच्या वाहनास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला खोल भागात उलटली. त्यामुळे बस सोडून चोरट्याला पळ काढावा लागला. २ नोव्हेंबर रोजी सकाळी मंगरुळपीर आगारात याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर विभागीय नियंत्रकांसह इतर अधिकाऱ्यांनी मंगरुळपीर येथे दाखल होऊन याबाबत चौकशीही केली. दरम्यान, रस्त्याच्याकडेला उलटलेली ही बस राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाºया कंत्राटदार कंपनीच्या कामगारांनीच के्रनच्या आधारे बाहेर काढली. त्यानंतर ही बस मंगरुळपीर आगारात नेण्यात आली. या प्रकरणी संबंधित कर्मचाºयांची विभागीय नियंत्रकांकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविल्याची माहिती मिळाली नाही.

 

Web Title: ... and thieves ran away with the bus of akola depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.