आंध्रप्रदेशमधून विदर्भात आलेला ११ लाखांचा गुटखा जप्त!

By admin | Published: April 6, 2017 02:00 AM2017-04-06T02:00:10+5:302017-04-06T02:00:10+5:30

वाशिम : आंध्रप्रदेशमधून अवैधपणे विदर्भात आणला जाणारा ११ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफिने सापळा रचून जप्त केला.

Andhra Pradesh receives 11 lakh gutkha from Vidarbha | आंध्रप्रदेशमधून विदर्भात आलेला ११ लाखांचा गुटखा जप्त!

आंध्रप्रदेशमधून विदर्भात आलेला ११ लाखांचा गुटखा जप्त!

Next

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ
वाशिम : आंध्रप्रदेशमधून अवैधपणे विदर्भात आणला जाणारा ११ लाखांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफिने सापळा रचून जप्त केला. या कारवाईमुळे जिल्हाभरात गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आंध्रप्रदेशमधून बुधवारला गुटखा आणला जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे यांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनात गुटखा घेऊन येणारा ट्रक रोखण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक किरण साळवे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कातडे, संजय नंदकुले, स्वप्नील शेळके व रवी घरत यांनी अकोला महामार्गावर सापळा रचला. पोलीस पथकाने संशयीत ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यात ११ लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला कळविली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अजिंठेकर व यादव यांनी वाशिम येथे जप्त केलेल्या ट्रकमधील गुटखा व ट्रक जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३१ लाख रुपये असल्याची माहिती एपीआय किरण साळवे यांनी दिली. वाहनचालकासह संबंधित व्यक्तींवर वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
डीबी पथकाच्या हाती निराशा
वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत डिटेक्शन ब्रँचमधील पथकाला एका ट्रकमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून डीबी पथकाने संशयीत ट्रकचालकाला ट्रकसह पोलीस ठाण्यात आणले; मात्र तपासणी केली असता, अवैध वस्तू अथवा खाद्यपदार्थ आढळून आला नाही.

Web Title: Andhra Pradesh receives 11 lakh gutkha from Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.