अंगणवाडीतील आधार नोंदणीचा पेच कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 03:32 PM2019-12-27T15:32:01+5:302019-12-27T15:32:07+5:30

अंगणवाडी केंद्रातील आधार नोंदणी एका वर्षानंतरही सुरु होऊ शकली नाही.

Anganwadi Aadhaar Registration pending | अंगणवाडीतील आधार नोंदणीचा पेच कायम!

अंगणवाडीतील आधार नोंदणीचा पेच कायम!

Next

वाशिम : अंगणवाडी केंद्रातील बालकांची आधार नोंदणी करण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅब पुरविण्यात आले आहेत. परंतु वरिष्ठांकडून रजिस्ट्रेशन अप्राप्त असल्याने पश्चिम वºहाडातील अंगणवाडी केंद्रातील आधार नोंदणी एका वर्षानंतरही सुरु होऊ शकली नाही.
अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार व अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी दीड वर्षांपूर्वी आधार नोंदणी बंधनकारक केली आहे. आधार नोंदणीअभावी शासनाच्या योजनांपासून कोणतेही बालक वंचित राहू नये म्हणून शासनाने एका आदेशान्वये जून २०१८ मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिकांवर आधार नोंदणीची जबाबदारी सोपविली. पर्यवेक्षिकांना मोबाईल टॅब देऊन बालकांची आधार नोंदणी करणे, अशी ही प्रक्रिया आहे. एका पर्यवेक्षिकेकडे साधारणत: २५ ते ३० अंगणवाडी केंद्रांची जबाबदारी असते. पश्चिम वºहाडातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मोबाईल टॅबही प्राप्त झाले आहेत. वाशिम जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ४० मोबाईल टॅब प्राप्त झाले. पर्यवेक्षिकांना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले. परंतू, अजून रजिस्ट्रेशन आले नसल्यामुळे आधार नोंदणी सुरू होऊ शकली नाही.
 

अंगणवाडी केंद्रात आधार नोंदणी करण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकांना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले. परंतू, अद्याप वरिष्ठांकडून रजिस्ट्रेशन आले नसल्यामुळे आधार नोंदणी सुरू होऊ शकली नाही.
- तुषार जाधव
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
जिल्हा परिषद वाशिम

Web Title: Anganwadi Aadhaar Registration pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.