कर्तव्यात दिरंगाई भोवली  :  ब्रम्हा येथील अंगणवाडी मदतनीस बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 06:29 PM2017-12-19T18:29:13+5:302017-12-19T18:32:41+5:30

वाशिम -सतत गैरहजर राहणे, कर्तव्यात दिरंगाई, कामात कुचराई आदी कारणांहून ब्रह्मा येथील अंगणवाडी मदतनीस लक्ष्मी नरेंद्र घुगे यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी  मंगळवारी दिले. 

Anganwadi assistant in Bramas suspended | कर्तव्यात दिरंगाई भोवली  :  ब्रम्हा येथील अंगणवाडी मदतनीस बडतर्फ

कर्तव्यात दिरंगाई भोवली  :  ब्रम्हा येथील अंगणवाडी मदतनीस बडतर्फ

googlenewsNext
ठळक मुद्दे एकात्मिक बालविकास सेवा योजना वाशिम अंतर्गत ब्रम्हा येथील अंगणवाडी मदतनीस या सतत गैरहजर राहत असल्याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.या कारवाईमुळे कामचुकार अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे धाबे दणाणले आहेत.

वाशिम -सतत गैरहजर राहणे, कर्तव्यात दिरंगाई, कामात कुचराई आदी कारणांहून ब्रह्मा येथील अंगणवाडी मदतनीस लक्ष्मी नरेंद्र घुगे यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी  मंगळवारी दिले.  एकात्मिक बालविकास सेवा योजना वाशिम अंतर्गत ब्रम्हा येथील अंगणवाडी मदतनीस या सतत गैरहजर राहत असल्याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. गैरहजर राहण्यासोबतच कर्तव्यात दिरंगाई करणे, कामात कुचराई करीत असल्याची तक्रार बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांच्याकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, अंगणवाडी मदतनीस दोषी आढळून आल्याने नायक यांनी लक्ष्मी घुगे यांना तात्काळ सेवेतून कमी करण्याचे आदेश मंगळवारी  िदले. एकीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. इंगळे यांचे मार्गदर्शनात वाशिम तालुक्यात आदर्श अंगणवाडीची संकल्पना साकारली जात असतानाच, दुसरीकडे कामात कसूर केलेल्या मदतनीसवर घरी बसण्याची वेळ आली आहे. या कारवाईमुळे कामचुकार अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे धाबे दणाणले आहेत. कामात कुचराई करणाºया, अंगणवाडीतील बालकांच्या भवितव्याशी खेळणाºयांविरूद्ध यापुढेही आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे नायक यांनी सांगितले. 

Web Title: Anganwadi assistant in Bramas suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम