अंगणवाडी सेविका, मदतनीसांचे आज जेलभरो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:37 AM2017-10-05T01:37:18+5:302017-10-05T01:37:53+5:30
वाशिम: जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एल्गार पुकारला असून गुरुवार, ५ ऑक्टोबर रोजी जेलभरो आंदोलन केले जात आहे. जिल्हाभरातील सेविका व मदतनिस यांनी गुरूवारी दुपारी १२ वाजता वाशिमच्या बसस्थानकावर जमा होऊन दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार्या जेलभरो आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आयटक’च्या अध्यक्ष सविता इंगळे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वेळोवेळी मानधनवाढीसाठी राज्यशासनाकडे सनदशीर मार्गाने मागणी नोंदविली. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सेविका व मदतनीस यांनी जेलभरो आंदोलनाचा मार्ग अनुसरला आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचार्यांना मानधन वाढ व इतर मागण्या राज्यशासनाने मान्य केल्या होत्या. मात्र, दीड वर्ष उलटूनही त्या मागण्या तशाच प्रलंबित आहेत. त्यातील एकही मागणी शासनाने निकाली काढली नाही.
या संतापजनक प्रकाराबद्दल अंगणवाडी कर्मचार्यांमध्ये शासनाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गुरूवारी केल्या जाणार्या जेलभरो आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन छेडणार असल्याचे अंगणवाडी कर्मचार्यांकडून ठरविण्यात आले.
तथापि, जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचार्यांनी वाशिम येथील बसस्थानकावर १२ वाजता जमा होऊन दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयटकचे कॉ. दिलीप उटाने, अध्यक्ष सविता इंगळे, कार्याध्यक्ष कॉ. डिगांबर एस. राठोड, सचिव मालती राठोड, उपाध्यक्ष पद्मा सोळंके, सीता तायडे, माधुरी पाठक, ज्योती देशमुख, कोषाध्यक्ष रंजना भिसे, जिल्हा संघटन संजय मंडवधरे, वाशीम तालुकाध्यक्ष किरण गिर्हे व सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.
-