बँक खाते आधार कार्डशी संलग्न न झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून्या पद्धतीनेच मिळणार मानधन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:43 PM2018-03-06T16:43:15+5:302018-03-06T16:43:15+5:30
वाशिम - बँक खाती आधार कार्डशी संलग्न न झालेल्या कर्मचाऱ्यांना मार्च २०१८ पर्यंतचे मानधन जून्या पद्धतीने वितरण केले जाणार आहे.
वाशिम - गत वर्षापासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना आधार संलग्नित बँक खात्यात मानधन अदा केले जात आहे. मात्र, अद्याप काही कर्मचाऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न झाली नसल्याने मानधन वितरणाचा पेच निर्माण झाला. या पृष्ठभूमीवर बँक खाती आधार कार्डशी संलग्न न झालेल्या कर्मचाऱ्यांना मार्च २०१८ पर्यंतचे मानधन जून्या पद्धतीने वितरण केले जाणार आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन वेळेत मिळावे यासाठी वेतनाला आॅनलाईनची जोड देण्यासाठी फेब्रुवारी २०१७ पासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका आदींकडून बँक खाते क्रमांकाशी आधार क्रमांक जोडणीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. अद्याप काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक प्राप्त झाले नाहीत. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील जवळपास २३० कर्मचाºयांचा समावेश आहे. बँक खाती आधार कार्डशी संलग्न न झाल्याने पश्चिम वºहाडातील काही अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन आॅनलाईन पद्धतीने होऊ शकले नाही. या कर्मचाºयांकडून आधार क्रमांक वारंवार मागविण्यात आले. मात्र, आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न न झाल्याने मानधनाचा पेच निर्माण झाला. सन २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपायला शेवटचा एक महिना शिल्लक असल्याने आधार क्रमांकाअभावी मानधन रखडलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना मार्च २०१८ पर्यंतचे मानधन जून्या पद्धतीने दिले जाणार आहे. सर्व अंगणवाडी कर्मचाºयांची बँक खाती आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ अशी निश्चित केली आहे. कोणत्याही परिस्थितीत १ एप्रिल २०१८ पासून अंगणवाडी कर्मचाºयांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने आधार संलग्नित बँक खात्यातच जमा करण्यात यावे, अशा सूचना वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाºयांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. वाशिम तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाºयांना आधार क्रमांक हा बँक खात्याशी संलग्नित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.