कर्जमाफी योजनेबाबत नाराज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 05:21 PM2018-01-15T17:21:40+5:302018-01-15T17:38:22+5:30

मालेगाव: धोरणामुळे हताश झालेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगावच्या शेतकऱ्याने थेट आत्महत्येची परवानगीच मागितली आहे. यासाठी त्यांनी १५ जानेवारीला आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 

angered about the loan waiver scheme, a farmer saught suicide permission |  कर्जमाफी योजनेबाबत नाराज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी

 कर्जमाफी योजनेबाबत नाराज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी

Next
ठळक मुद्देशासनाने प्रोत्साहन भत्त्याच्या नावावर केवळ २५ हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कोळगाव बु. येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक आणि तहसीलदार महल्ले यांना निवेदन दिले.दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी किंवा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणीही केली आहे. 

मालेगाव: शासनाने यंदा शेतकऱ्यांना  दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. तथापि, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात. त्यांना मात्र उसणवारी करून नियमित कर्जाची परतफेड करणाºया शेतकऱ्यांना  मात्र प्रोत्साहनाच्या नावावर तुटपुंजी रक्कम देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केल्या गेला. या धोरणामुळे हताश झालेल्या मालेगाव तालुक्यातील कोळगावच्या शेतकऱ्याने थेट आत्महत्येची परवानगीच मागितली आहे. यासाठी त्यांनी १५ जानेवारीला आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 

मालेगाव तालुक्यातील कोळगाव बु. येथील शेतकरी विजय शेंडगे यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक आणि तहसीलदार महल्ले यांना निवेदन देताना असे नमूद केले आहे, की ज्या शेतकºयांनी पीककर्ज घेऊन त्याची परतफेड केली नाही. त्यांना शासनाने दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली; परंतु कर्जाचे नियमित हप्ते भरणाया आणि त्यासाठी सावकारी कर्ज, उसणवारीचे व्यवहारही के ले. त्या शेतकºयांना मात्र प्रोत्साहन भत्त्याच्या नावावर केवळ २५ हजार रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे. बँकांच्या लेखी आमच्याकडे थकित कर्ज नसले तरी, आम्ही बँकांचे कर्ज फेडण्यासाठी सावकारी कर्ज काढले आणि उसणवारीही केली आहे. शासनाला मात्र त्याची पुसटशीही कल्पना नाही. त्यातच यंदा अपुºया पावसामुळे कृषी उत्पादन घटल्यानंतर बाजारात या शेतमालास २७०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत. तुरीलाही ४००० ते ४५०० रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकºयांनी या पिकासाठी केलेला खर्चही वसुल होणे कठीण आहे. त्यामुळे जगावे की, मरावे, हा प्रश्न आमच्यापुढे उपस्थित झाला आहे. या बाबीचा विचार करून नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी किंवा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणीही या शेतकºयाने निवेदनातून केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनाही पाठविली निवेदनाची प्रत

विजय शेंडगे यांनी शेतकºयांच्या समस्या उजागर करताना आत्महत्येच्या परवानगीसाठी जे निवेदन आमदारांसह तहसीलदारांकडे पाठविले. त्या निवेदनाचय प्रती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडेही पाठविल्या आहेत. त्याशिवाय मालेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांकडेही निवेदनाची प्रत पाठविली आहे. 

Web Title: angered about the loan waiver scheme, a farmer saught suicide permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.