संतप्त महीला प्राधीकरणाच्या कार्यालयावर धडकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 06:21 PM2019-07-13T18:21:09+5:302019-07-13T18:21:12+5:30
निवेदन देवुन सुध्दा कारवाई घेत नसल्यामुळे कारखेडच्या महिला उपकार्यकारी अभियंता कारंजा कार्यालयात १२ जुलै रोजी धडकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील कारखेडा येथील २८ गावे पाणी पुरवठा योजनाच्या विशेष पाणी पुरवठा योजनेच्या प्रमुख पाईपलाईनवर अनेक अवैध नळ कनेक्शन जोडले आहे. त्यामुळे अधिकृत नळ कनेक्शनधारकांना पाणी मिळत नाही. निवेदन देवुन सुध्दा कारवाई घेत नसल्यामुळे कारखेडच्या महिला उपकार्यकारी अभियंता कारंजा कार्यालयात १२ जुलै रोजी धडकल्या.
पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन गावाबाहेरुन टाकण्यात आली, परंतु डांबरी रोड फोडून अनेक नागरिकांनी अवैध नळ कनेक्शन प्रमुख पाईप लाईनला जोडले, त्यामुळे ठरलेल्या नळ कनेक्शन धारकांना पाणी मिळत नाही. ही अवस्था अनेक वर्षापासुन आहे यासाठी प्राधिकरणच्या कर्मचाºयांना वेळोवेळी कल्पना दिली, त्यानंतर मागील महिन्यात उपकार्यकारी अभियंता अवैध नळ कनेक्शन तोडा यासाठी निवेदन सुध्दा दिले, परंतु कार्यवाही झाली नाही . निवेदनावर ग्रामपंचायत सदस्या उमा किशोर चव्हाण , वनिता किशोर राठोड, माया बळीराम बुंदले, सुनिता बालचंद चव्हाण सह अनेक महिला पुरुष यांची उपस्थिती होती.
२८ गावे पाणी पुरवठा !
कारखेडा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मार्फत राबवत असलेल्या २८ गावे पाणी पुरवठा कार्यरत आहे. परंतु वार्ड एक मध्ये अर्धा भागात पाणी पुरवठा होत नाही, म्हणुन सन २०१४ मध्ये तत्कालीन आमदार प्रकाश डहाके यांनी पुरक पाणी पाणी पुरवठा योजना मंजुर केली होती.