पाळीव प्राण्यांवर हिंस्त्र पशूंचे हल्ले वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:27 AM2021-07-21T04:27:13+5:302021-07-21T04:27:13+5:30

*दोन आठवड्यात चौथ्यांदा बिबट्याचा हल्ला* मानोरा : तालुक्यातील ईंगलवाडी परिसरामध्ये जंगली हिंस्त्र पशुंचा हैदोस मागील काही आठवड्यापासून उत्तरोत्तर ...

Animal attacks on pets increased | पाळीव प्राण्यांवर हिंस्त्र पशूंचे हल्ले वाढले

पाळीव प्राण्यांवर हिंस्त्र पशूंचे हल्ले वाढले

googlenewsNext

*दोन आठवड्यात चौथ्यांदा बिबट्याचा हल्ला*

मानोरा : तालुक्यातील ईंगलवाडी परिसरामध्ये जंगली हिंस्त्र पशुंचा हैदोस मागील काही आठवड्यापासून उत्तरोत्तर वाढत असल्याच्या घटना घडत आहेत. साेमवारी शेळीच्या कळपावर बिबट्याने पुन्हा हल्ला केल्याने अनेक शेळया जखमी झाल्यात.

६ जुलै रोजी बिबट्याच्या हल्ल्यात ईंगलवाडी येथील दोन शेतकऱ्यांच्या शेळ्या बळी पडल्या होत्या, ही घटना ताजी असतानाच १० जुलै रोजी ईंगलवाडी- हिवरा रस्त्यावर हिंस्त्र पशूद्वारा अर्धवट खाल्लेली शेळी रस्त्याच्या मधोमध मृतावस्थेत आढळून आली. १९ जुलै रोजी दुपारी बाराच्या दरम्यान राम जयसिंग राठोड शेतकऱ्याचा मुलगा आपल्या शेताशेजारी असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील एका शेळीवर झडप घातल्याने सदरील शेळी गंभीर जखमी झाली आहे. समोर साक्षात बिबट दिसल्यावर या मुलाने जिवाच्या आकांताने आरडाओरडा केल्याने सोबतची कुत्री बिबट्यावर धावून गेल्यामुळे बिबट्या जंगलात पसार झाला. मेंद्रा बीटमधील या इंगलवाडी गावामध्ये जंगली श्वापदांचे पाळीव प्राण्यावर हल्ले उत्तरोत्तर वाढत असून, पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये घबराट व चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. हिंस्त्र प्राणी त्यामुळे गायीगुरे, शेळ्या, मेंढ्या चारणे यामुळे अवघड झालेले असल्याने वनप्रशासनाने सदरील बाबीकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

ईंगलवाडी वन परिसरामध्ये आधीपासूनच बिबट्यांचे वास्तव्य आहे. शक्‍यतोवर हा प्राणी मानवावर हल्ला करीत नाही. अनावधानाने बिबट्याच्या हल्ल्यात जर कुण्या नागरिकांची पाळीव प्राणी दगावले अथवा जखमी झाले असेल तर नुकसानभरपाईची तजवीज वनविभागाकडून करण्यात येते. संबंधितांनी नजीकच्या वन कार्यालयात हल्ल्यासंबंधी तक्रार करावी, नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून मदत मिळेल.

सुमंत सोळंके, डी. एफ. ओ., वाशिम

Web Title: Animal attacks on pets increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.