प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होणार!
By admin | Published: January 22, 2017 02:56 AM2017-01-22T02:56:04+5:302017-01-22T02:56:04+5:30
वाशिम जिल्ह्यातील कत्तलखाना चालकांचे धाबे दणाणले.
वाशिम, दि. २१- प्राण्यांच्या हत्येला बंदी असतानादेखील वाशिम शहरात प्राण्यांच्या कत्तली सर्रास सुरू असल्याची बाब गुरुवारी शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये अधोरेखित झाली. याप्रकरणी पोलिसांनी पहिल्यांदाच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ चे सुधारणा सन २0१५ गुन्हा दाखल केल्यामुळे कत्तलखाना चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. राज्यात प्राणी संरक्षण कायद्याची सुधारणा २0१५ मध्ये झाली होती. प्राणी संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा झाल्यानंतर वाशिम शहरात प्रथमच ठाणेदार कदम यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी १४ जणांवरे व एक वाहन असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करून वाहनचालक मोसीन अहमद अब्दुल गणी याला अटक केली. याप्रकरणी ठाणेदार कदम यांनी पहिल्यांदाच सुधारित प्राणी संरक्षण कायद्यानुसार मोसीन अहमद अब्दुल गणी याचेविरुद्ध गुन्हा दाखल करून अंमलबजावणी केली. ठाणेदार कदम यांनी गोपनीयरीत्या छापा टाकल्यामुळे काही अधिकार्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या गेल्या.