‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी वाशिममध्ये काढली ‘जवाब दो’ रॅली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 03:54 PM2018-08-20T15:54:57+5:302018-08-20T15:56:02+5:30
वाशिम : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या येथील शाखेच्या वतीने २० जुलै ते २० आॅगस्टदरम्यान ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ आणि ‘जवाब दो’ आंदोलन राबविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या येथील शाखेच्या वतीने २० जुलै ते २० आॅगस्टदरम्यान ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ आणि ‘जवाब दो’ आंदोलन राबविण्यात आले. याअंतर्गत २० आॅगस्टला वाशिममध्ये ‘जवाब दो’ रॅली काढून जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करण्यात आले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाला २० आॅगस्ट रोजी पाच वषे पूर्ण झाली. तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनास साडे तीन वर्षे पूर्ण होत आहेत. कर्नाटकातील माजी कुलगुरु प्रा. डॉ. एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार लंकेश गौरी यांच्याही हत्या झाल्या. मात्र, या सर्व प्रकरणांच्या तपासात अक्षम्य दिरंगाई होत असल्याचा आरोप महाराष्ट्र अंनिसच्या वतीने यावेळी करण्यात आला. यासंदर्भात शासनाला जाब विचारण्याकरिता ‘जवाब दो’ आंदोलन राबविण्यात येत असून २० आॅगस्टला यानिमित्त भव्य रॅली काढण्यात आली.