अंकुर साहित्य संघाची कार्यकारीणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:48 PM2017-09-15T19:48:18+5:302017-09-15T19:48:42+5:30
मंगरुळपीर : नवोदीत कवी,लेखक, साहित्यीक यांच्या हक्काचे विचारपिठ असलेल्या अंकुर साहित्य संघाचाी जिल्हा कार्यकारिणी राष्ट्रमाता जिजाऊ सभागृह मंगरुळपीर येथे पार पडलेल्या सहविचार सभेत एकमताने गठीत करण्यातआली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : नवोदीत कवी,लेखक, साहित्यीक यांच्या हक्काचे विचारपिठ असलेल्या अंकुर साहित्य संघाचाी जिल्हा कार्यकारिणी राष्ट्रमाता जिजाऊ सभागृह मंगरुळपीर येथे पार पडलेल्या सहविचार सभेत एकमताने गठीत करण्यातआली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अंकुर साहित्य संघाचे केंद्री अध्यक्ष अरविंद भोंडे, केंद्रीय सचिव हिम्मत ढाळे, विदर्भ प्रमुख संतोष कोकाटे, शिवलिंग काटेकर ,सतिष जामोदकर, यांनी अंकुर साहित्य संघाचे कार्य, साहित्य संमेलने, पुस्तक प्रकाशन आदि विषयांवर चर्चा व मनोगते व्यक्त केली उपस्थित सर्व साहित्यीक यांना दिपक राऊत यांचे वºहाडी एक्सप्रेस काव्यसंग्रह पुस्तक व पुष्पगुच्छ भेट देवुन स्वागत करण्यात आले.
वाशिम जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष दिपक राजाराम राऊत जिल्हा सचिव गोपाल वसंतराव खाडे, कामरगाव प्रा.अशेक सारडा केनवड, सतिश जामोदकर हिवरा बु, गजानन कदम कारंजा, वैभव भिवरकर कारंजा, राजेंद्र देशमुख मोटेगाव, रिसोड श्रीनिवास राघवेंद्र जोशी कारंजा ,चाफेश्वर गांगवे रिसोड, माणिक डेरे मानोरा, मेहताब पटेल मंगरुळपीर, जनार्दन भगत, रामहरी पंडीत, प्रा.संजय कावरे, सुनिल मालपाणी, के.एस.इंगोले, ओ.पी.मालवलकर, नारायण वºहाडे, नाना देवळे, फुलचंद भगत, राजेश दबडे, रश्मी इंगळे, रिता राऊत, सुधीर पाटील आदिंची एकमताने निवड करण्यात आली. तसेच मंगरुळपीर तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब हवा पाटील, उपाध्यक्ष रशिदभाई , सचिव युवराज टोपले, सहसचिव धनंजय गावंडे, कोषाध्यक्ष शामकुमार वानखडे, भिमराव श्रृंगारे, बाळु काळे, दौलत खडसे, मदन पवार, विठ्ठल मनवर, रामकृष्ण खंडारे, विश्वनाथ इंगोले यांची निवड करण्यात आली. रिसोड तालुकाध्यक्षपदी दिगंबर पवार, सचिवपदी अभिमान पाचरणे, मानोरा तालुकाध्यक्षपदी गजानन घुबडे, सचिवपदी माणिक डेरे, यांची अविरोध निवड करण्यात आली .