कोरोना महामारीची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:37 AM2021-04-03T04:37:48+5:302021-04-03T04:37:48+5:30

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील एक ५९ वर्षीय व्यक्ती गतवर्षी मार्च महिन्यात दिल्ली येथील एका धार्मिक संमेलनात सहभागी झाला होता. ...

Anniversary of the Corona Epidemic | कोरोना महामारीची वर्षपूर्ती

कोरोना महामारीची वर्षपूर्ती

Next

मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील एक ५९ वर्षीय व्यक्ती गतवर्षी मार्च महिन्यात दिल्ली येथील एका धार्मिक संमेलनात सहभागी झाला होता. तो गावात परतल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याची चाचणी करण्यात आली. त्यात ३ एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यानंतर महिनाभर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. तथापि, २ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल केलेल्या उत्तर प्रदेशातील एका ट्रक क्लिनरचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना चाचणी अहवाल ३ मे रोजी पॉझिटिव्ह आला. हा जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी ठरला. दरम्यान, त्यानंतर मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका व्यक्तीचा वर्ध्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला आणि तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. जिल्ह्यात डिसेंबर २०२० पर्यंत ६६६३ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला होता, तर नव्या वर्षात १ जानेवारी ते ३१ एप्रिलपर्यंत त्यात आणखी साडेसहा हजार व्यक्तींची भर पडली. अर्थात, २०२१ मधील बाधितांचे प्रमाण २०२० च्या तुलनेत तिपटीहून अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

---------------

औषधोपचारासाठी पुरेसा औषध साठा

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना औषधींचा वापरही वाढत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा निधी असून, सर्वच कोविड केअर सेंटरमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे.

-----------

जिल्हाभरात १४ कोविड सेंटर

ऑक्टोबर २०२० पासून कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्याने शहर स्तरावरील ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हास्तरावरील जिल्हा रुग्णालयासह इतर एक, दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरू ठेवत इतर बंद करण्यात आले; परंतु आता कोरोना संसर्ग वाढू लागल्याने बंद केलेल्या कोविड सेंटरपैकी ६ कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले असून, आता जिल्ह्यात १४ कोविड सेंटर सुरू आहेत.

----------------

पहिला कोरोना बाधित व्यवसायात मग्न

जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील या व्यक्तीने उपचाराला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. या व्यक्तीचा दुधाचा व्यवसाय असून, तो दुग्ध व्यवसायात मग्न असून, कुटुंबासोबत आनंदात वेळ घालत असल्याचे त्याने सांगितले.

कोरोनाचा प्रवास

महिनानिहाय वाढलेले रुग्ण आणि मृत्यू

२०२० मृत्यू बाधित-

एप्रिल - ०१

मे - ०७

जून - ८८

जुलै - ४८८

ऑगस्ट - ११६९

सप्टेंबर -३०७८

ऑक्टोबर - २७२

नोव्हेंबर - १०६३

डिसेंबर - ४९७

========================

जानेवारी (२०२१) ०६ - ४८१

फेब्रुवारी ०६ - १७९०

मार्च २७ - ७१४१

एप्रिल ०१ -३२३

---------------------------

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह - १६३९८

उपचार सुरू असलेले -२६६३

कोरोना बळी - १८८

कोविड सेंटर्स -१४

Web Title: Anniversary of the Corona Epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.