‘वार्षिक सवलत कार्ड’ बंद करणे अयोग्य!
By admin | Published: May 1, 2017 02:09 AM2017-05-01T02:09:12+5:302017-05-01T02:09:12+5:30
लोकमत परिचर्चेतील सूर : निर्णयाचा फटका एसटी महामंडळालाच!
वाशिम : एसटी महामंडळ तोट्यात असतानाच, प्रवासी आणि उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी प्रवाशांसाठी १३ वर्षांपूर्वी सुरू केलेली वार्षिक सवलत कार्ड योजना २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली. या योजनेत प्रवाशांना प्रवासात १० टक्के सवलत मिळत होती. मात्र, ही योजना २२ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसटीचा वर्षाला २ ते ३ कोटींचा महसूल बुडणार असून, या योजनेचा फायदा घेणाऱ्या प्रवाशांचेही नुकसान होणार आहे. याबाबत प्रवाशांचे मत जाणून घेण्यासाठी लोकमतच्या स्थानिक कार्यालयात रविवारी परिचर्चा घेण्यात आली. त्यामध्ये काही जणांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे तर काही जणांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. या परिचर्चेत आशिष जैन, अनिल चव्हाण, एम. व्ही. डवरे आणि मनोज भोयर या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग घेऊन आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला.
२प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने २००३ सालापासून वार्षिक सवलत कार्ड योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एक वर्ष कालावधीकरिता २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे हजारो प्रवासी या योजनेचा फायदा घेऊन एसटीनेच प्रवास करीत होते. त्यामुळे एसटीला फायदाच होता. आता ही योजना बंद झाल्यामुळे एसटीकडील प्रवाशांची संख्या कमी होईल.
- एम. व्ही. डवरे, आश्रम शाळा संघ प्रदेशाध्यक्ष
वार्षिक सवलत कार्ड योजनेंतर्गत २०० रुपये मुल्य आकारण्यात येत होते. हे कार्ड असल्यास प्रवाशाला १० टक्के सवलत देण्यात येत होती. या सेवेचा प्रवाशांंना चांगलाच फायदा होत होता, तर एसटीच्या तिजोरीत वर्षाला २ ते ३ कोटी रुपयांची भर पडत होती. त्यामुळे ही योजना बंद करणे चुकच आहे.
- मनोज भोयर
वार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होते. प्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे एसटी आणि प्रवाशांनाही फायदाच होता. ही बाब खरी आहे; परंतु ही योजना बंद केल्याने एसटीचे नुकसान होईल, असे म्हणता येणार नाही. कारण एसटी इतर योजनांच्या माध्यमातून आपले उत्पन्न वाढवू शकते, असे आपल्याला वाटते.
-अनिल चव्हाण
वार्षिक सवलत कार्ड योजनेत २०० रुपये मुल्य आकारून कार्ड देण्यात येत होतेप्रवाशाला प्रवासी तिकिटात १० टक्के सवलत देण्यात येत होती. त्यामुळे एसटीला फायदाच होता. हजारो प्रवासी एसटीचा आधार घेत होते. ही योजना बंद केल्याने एसटीचेच नुकसान आहे.
- आशिष जैन, कारंजा लाड