जिल्ह्यात आणखी १० कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:42 AM2021-02-11T04:42:30+5:302021-02-11T04:42:30+5:30
डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले. फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहेत. कोरोनामुळे आणखी ...
डिसेंबर व जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आले. फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढउतार दिसून येत आहेत. कोरोनामुळे आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची नोंद बुधवारी घेण्यात आली. बुधवारी (दि. १०) एकूण १० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील काटा येथील २, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील १, इतर ठिकाणचे २, शहापूर येथील २, कारंजा शहरातील प्रियदर्शिनी कॉलनी परिसरातील ३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.
कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,२५७ वर पोहोचला आहे. बुधवारी १० जणांना रुग्णालयातून सुटी झाली. आतापर्यंत कोरोनामुळे १५५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी वाशिम शहरात कुणीही कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले नाही. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
१०६ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ७,२५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,९९५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट केले.