जिल्ह्यात आणखी ११ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:35+5:302021-01-08T06:12:35+5:30
वाशिम : जिल्ह्यात आणखी ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ७ जानेवारी रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला. एकूण बाधितांची संख्या ६,७४२ ...
वाशिम : जिल्ह्यात आणखी ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ७ जानेवारी रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला. एकूण बाधितांची संख्या ६,७४२ वर पोहोचली आहे. दरम्यान, गुरुवारी ३६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. गुरुवारी नऊ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील रॉयल प्लाझाजवळील १, कृष्णा येथील १, मंगरुळपीर शहरातील अनंत नगर येथील १, दूधखेडा येथील १, रिसोड शहरातील शिवाजी चौक येथील १, गजानन नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, वनोजा येथील १, मांगवाडी येथील १, पळसखेड येथील १, कारंजा शहरातील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.
कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,७४२ वर पोहोचला आहे. गुरुवारी ३६ जणांना रुग्णालयातून सुटी झाली.
०००
१०३ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,७४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,४८८ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.