जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:12+5:302021-01-08T06:10:12+5:30
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याचे सहा दिवसाच्या अहवालावरून तूर्तास दिसून येते. बुधवारी नऊ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह ...
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याचे सहा दिवसाच्या अहवालावरून तूर्तास दिसून येते. बुधवारी नऊ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील शिवचौक येथील १, महाराणा प्रताप चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, रिसोड शहरातील समर्थ नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मंगरूळपीर तालुक्यातीत नागी येथील १, वनोजा येथील १, कारंजा शहरातील राजपुरा परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, चांदई येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,७३१ वर पोहोचला आहे. बुधवारी तीन जणांना रुग्णालयातून सुटी झाली.
०००
१२८ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,७३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,४५२ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.