वाशिम जिल्ह्यात आणखी १२६ कोरोना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 11:59 AM2021-02-28T11:59:10+5:302021-02-28T11:59:28+5:30
Washim corona News २४ फेब्रुवारी रोजी १२६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, २४ फेब्रुवारी रोजी १२६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. दरम्यान, ४३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
गत आठवड्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी १२६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील १६, वारा जहांगीर १, तामसी १, ब्रह्मा येथील २, भटउमरा येथील १, शेलू येथील २, रिसोड शहरातील १०, एकलासपूर येथील १, गणेशपूर येथील १, वाकद येथील १, घोटा येथील १, मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील १, भौरद येथील १, मानोरा शहरातील २, नाईक नगर येथील २, साखरडोह येथील १, गळमगाव येथील १, हिवरा बु. येथील १, असोला खु. येथील २, वाटोद येथील १, मंगरुळपीर शहरातील ९, तपोवन येथील १, पेडगाव येथील ४, शेंदूरजना येथील १, वनोजा येथील २, मोहरी येथील ४, सावरगाव येथील २, शहापूर येथील ४, मसोला येथील १, कारंजा शहरातील ३१, खडी धामणी येथील १, पोहा येथील १, वाढवी येथील २, बेलमंडल येथील १, उंबर्डा येथील १, शहा येथील ३, हिवरा लाहे येथील ५, आखतवाडा येथील १, पिंपरी मोडक येथील १, चवसाळा येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील १ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच ४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा ८,७४७ वर पोहोचला आहे. आतापर्यंत १५७ जणांचा मृत्यू झाला.