जिल्ह्यात आणखी १६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:41 AM2021-01-19T04:41:30+5:302021-01-19T04:41:30+5:30
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. सोमवारी १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील ...
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. सोमवारी १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील जुनी आययूडीपी येथील १, पाटणी चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मोहजा रोड येथील १, रिसोड शहरातील शिवाजीनगर येथील १, इतर ठिकाणचा १, गोवर्धन येथील १, बोरगाव येथील १, मंगरूळपीर शहरातील बायपास रोड परिसरातील १, पोस्ट ऑफिस परिसरातील १, व्ही. एन. कॉलेज परिसरातील १, राम मंदिर परिसरातील १, गोगरी येथील १, कारंजा शहरातील २, वाढवी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.
एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,९२१ वर पोहोचला आहे. सोमवारी १५ जाणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ६६०४ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे गावोगावी शिबिरे घेऊन संदिग्ध नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी धोका अजून पूर्णपणे संपलेला नसल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना नेहमी मास्क किंवा रुमालाचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००
१६४ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,९२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,६०४ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.