वाशिम शहरात आणखी २१ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:41 AM2021-02-24T04:41:59+5:302021-02-24T04:41:59+5:30
०००० मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा रिठद : रिसोड - वाशिम या प्रमुख रस्त्यावर आसेगाव पेन, रिठद परिसरात मोकाट जनावरे ...
००००
मोकाट जनावरांचा वाहतुकीस अडथळा
रिठद : रिसोड - वाशिम या प्रमुख रस्त्यावर आसेगाव पेन, रिठद परिसरात मोकाट जनावरे बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
मोकाट जनावरांनी प्रमुख मार्गावर काही महिन्यांपासून हैदोस घातला आहे. रस्त्यावर जनावरे बसत असल्याने अवजड वाहतुकीस व्यत्यय निर्माण होत आहे.
00००
शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी
जऊळका रेल्वे : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे यंदा पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत. त्यामुळे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी पालकांनी २३ फेब्रुवारी रोजी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण विभागाकडे केली.
कोरोनामुळे मार्च २०२० महिन्यापासून शाळा बंद आहेत. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा झाल्या नाहीत. यंदादेखील पहिली ते चौथीचे वर्ग बंदच आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, शैक्षणिक शुल्काची पूर्णपणे वसुली केली जात आहे. शैक्षणिक शुल्क माफ करावे किंवा ५० टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी जऊळका रेल्वे परिसरातील पालकांनी मंगळवारी केली.
००००
केनवड येथे तीन बाधित
केनवड : रिसोड तालुक्यातील केनवड येथील आणखी तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल २२ फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह आला. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.