जिल्ह्यात आणखी २३ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:20 AM2021-01-24T04:20:20+5:302021-01-24T04:20:20+5:30
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. शनिवारी २३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील ...
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. शनिवारी २३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १, देवपेठ येथील २, आययूडीपी कॉलनी येथील १, योजना कॉलनी येथील २, काटीवेस येथील १, हरिओमनगर येथील १, देव ले-आऊट येथील २, जुनी आययूडीपी येथील १, गुरुवार बाजार येथील १, तांदळी येथील १, तोंडगाव येथील १, काजळंबा येथील १, मंगरुळपीर शहरातील २, चांभई येथील १, मालेगाव तालुक्यातील रिधोरा येथील १, वसारी येथील १, कारंजा शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील १, सागर निवास परिसरातील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ७,००० वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६,६६९ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, कोरोनाचा आलेख खाली येत असला तरी कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक स्थळी गर्दी करू नये, घराबाहेर पडताना नेहमी मास्कचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.
००००
१६८ जणांवर उपचार
आतापर्यंत ७,००० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,६७९ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
०००