जिल्ह्यात आणखी २४५ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:33+5:302021-03-07T04:38:33+5:30

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी २४५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ६ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात ...

Another 245 corona positive in the district | जिल्ह्यात आणखी २४५ कोरोना पाॅझिटिव्ह

जिल्ह्यात आणखी २४५ कोरोना पाॅझिटिव्ह

Next

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी २४५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ६ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,९७८ वर पोहोचली आहे. शनिवारी २३५ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी आणखी २४५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील २१, दगड उमरा १२, वाळकी बाजारे १, ब्रह्मा १, कळंबा महाली १, सुरकंडी खुर्द ३, सुरकंडी बु. १, मालेगाव शहरातील ५, शिरपूर ४, जऊळका १, पांगरी कुटे येथील १, मानोरा शहरातील २, गादेगाव येथील १, गव्हा येथील १, कारखेडा येथील २, धामणी येथील १, नयणी येथील २, गिर्डा येथील १, पोहरादेवी येथील २, उमरी खु. येथील २, रिसोड शहरातील २०, नेतन्सा ८, मोप ६, असोला २, कवठा ५, करडा २, पांगरी कुटे १, मांगूळ झनक १, मंगरूळपीर शहरातील ४, गोलवाडी येथील ५, पुंजाजी नगर १, हिरंगी १, शेलूबाजार १, शहापूर येथील ५, धोत्रा येथील १, वनोजा येथील ३, पिंपळगाव येथील १, कुंभी येथील १, नवीन सोनखास येथील २, कासोळा येथील १, कारंजा शहरातील ३३, येवता येथील २, बेलमंडल येथील ३, लोहारा येथील १, पारवा कोहर येथील १, शहा येथील ८, रामटेक येथील ११, हिंगणवाडी येथील १, धनज बु. येथील २, पिंप्री मोडक येथील १, कामरगाव येथील १३, विळेगाव येथील ५, लाडेगाव येथील १, कामठा येथील १, बेंबळा येथील २, मसला येथील १, जामठी येथील १, वढवी येथील १, कोळी येथील १, काळी येथील ३, किन्ही रोकडे येथील १, चकवा येथील १, लोहगाव येथील १, मनभा येथील ६, पोहा येथील १, शिवनगर येथील ४ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून, २३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

००

१४०२ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत ९,९७८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ८,४१३ जणांनी कोरोनावर मात केली, तर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १,४०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Another 245 corona positive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.