वाशिम जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:12 AM2020-12-14T11:12:34+5:302020-12-14T11:12:45+5:30
Washim News रविवारी एकूण २६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात आणखी २६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १३ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला. आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,४१२ वर पोहोचली आहे. दरम्यान, ११ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रविवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. रविवारी एकूण २६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम तालुक्यातील उकळी पेन येथील १, अनसिंग येथील १, उमरा येथील १, रिसोड शहरातील २, आसेगाव येथील १, कोयाळी येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील नवीन सोनखास येथील १, पार्डी ताड येथील १, शिवनी येथील ५, चिखली येथील १, वनोजा येथील १, मालेगाव शहरातील १, किन्हीराजा येथील १, कारंजा लाड शहरातील २, पोहा येथील १, शिव नगर १, काजळेश्वर येथील १, मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील ३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. रविवारी जिल्ह्यातील ११ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,४१२ वर पोहोचला आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे १४७ जणांचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
२३३ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,४१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,०३१ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल येथे २३३ अक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट केले.