वाशिम जिल्ह्यात रविवारी आणखी २७ कोरोना ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:46 AM2020-12-21T11:46:11+5:302020-12-21T11:46:57+5:30
CoronaVirus in Washim : २० डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ६,५२० वर पोहोचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात आणखी २७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २० डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ६,५२० वर पोहोचली आहे. दरम्यान, १३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
डिसेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात. रविवारी (दि.२०) एकूण २७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील सिद्धीकॉलनी परिसरातील १, पोस्ट ऑफिसजवळील १, इनामदारपुरा येथील १, शिवाजीनगर येथील २, सुंदरवाटिका येथील २, रिसोड शहरातील सिव्हिल लाइन परिसरातील ३, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील १, अनंत कॉलनी परिसरातील १, मोप येथील १, भोकरखेडा येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील १, मोंटोकार्लो कॅम्प परिसरातील २, मानोरा तालुक्यातील म्हसणी येथील ३, मंगरूळपीर शहरातील राधाकृष्णनगर येथील १, मंगलधाम येथील २, कासोळा येथील १, झाडगाव येथील १, तऱ्हाळा येथील १, कारंजा लाड शहरातील शांतीनगर येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,५२० वर पोहोचला आहे. रविवारी १३ जणांना रुग्णालयातून सुटी झाली. आतापर्यंत कोरोनामुळे १४८ जणांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
२४६ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,५२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,१२५ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि तीन खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे २४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाचे स्पष्ट केले.